दोघांचेही चेहेरे असे कि समोरच बक्षीस आपल्यालाच मिळणारे. अर्णब गोस्वामी मुलाखतीला सुरुवात करतो तीच समोरच्याची लायकी काढायच्या उद्देशाने. माझं हिंदी फारसं चांगलं नाई तुमचं कसं ते आता समजेलच ह्या स्पष्ट उपरोधिक वक्तव्याचं उत्तर राज ठाकरेंची रोखलेली नजरच देते. तरीही निर्लज्ज पणे पहिल्या प्रश्नाला तो हात घालतो,पूर्ण मुलाखत ऐकताना असं वाटत राहतं कि बोलायचं दोघांनाही असत पण ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. मुलाखत घेणाऱ्याला फक्त प्रश्न विचारायचे असल्यासारखं वाटत ...समोरच्याच्या उत्तरांशी त्याच काही एक देणं घेणं नसत. आणि राज ठाकरेंना आपलं मत मांडायचा फक्त..समोरच्याचा प्रश्न काहीही असो..माझ्या मनातलं कोणी ऐकून घेत का, हा अविर्भाव. तरीही आपल्या मनातल्या कुठल्याही गोष्टीचा किंवा आपण जे काहीही बोलतोय त्याचा समोरच्याच्या प्रश्नांशी कुठून ना कुठून संबंध जोडणं राज ठाकरेंना छान साधत.
दोघंही एकमेकांना निरुत्तर करायचा कसून प्रयत्न करताना दिसतात, पाहताना वाटत कि आता राज ठाकरेंकडे या प्रश्नाचे उत्तर नसेल आणि त्यांच्या भल्यामोठ्या मुद्देसूद उत्तरानंतर अर्णब काय प्रश्न विचारतील याची उत्सुकता लागून राहते. मुलाखत तशी रंगात जाते ..पण प्रत्येक प्रश्नावर आणि प्रत्येक मुद्द्यावर अर्णब आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपण म्हणू तेच खरं असं थोडाफार पवित्रा अर्णब गोस्वामींच्या बोलण्यात दिसतो. राज ठाकरेंचं बोलणं थोडंसं बेफिकीर वाटत आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्या सामर्थ्याचा अभिमान डोकावतो.
प्रश्न विचारताना अर्णब थोडा मूर्ख वाटतो . एकच प्रश्न फिरून फिरून कसं विचारावा हे त्याच्याकडून शिकवा...१० व्हीच्या मुलांसची प्रश्नपत्रिका खूप छान सेट करू शकेल तो.जसा आम्हाला हिस्टरी चा पेपर आलेला. एकच प्रश्न गोल गोल फिरवून विचारलेला. ऐकताना एक वेळ अशी येते कि अर्णब डोक्यात जातो. राज ठाकरे पण काही गप्पा बसत नाहीत, सरळ माईक काढून ठेवीन म्हंटल्यावर जी २ सेकंद शांतता मिळाली ती खरंच खूप गरजेची होती.पहिली दुसरीतला मुलगाही असले फालतू प्रश्न विचारणार नाही..काही वेळा तर असं झालं कि उत्तर देऊन झाल्यानंतर तो प्रश्न विचारला जातो. ज्याला काहीएक अर्थ उरत नाही. जी मुलाखत ४ ते ५ मिनिटात संपू शकली असती ती संपायला ४४ मिनिट्स लागतात...एवढा वेळ एका पोलिटिकल लीडर चाही वाया जातो आणि तमाम श्रोतृ वर्गाचाही.मुलाखतीची आखणी बरोबर वाटत नाही. मुलाखत सुरु होते मोदी वरून मग त्याला वळण मिळत उद्धव ठाकरे नंतर बाळासाहेब ठाकरेंना उगाच मध्ये आणलं जात मुंडेंवरून नितीशकुमारांपर्यंत फिरून मुलाखत परत बाजप वर येते. questionnair तयार करताना अर्णब गोस्वामींनी प्रश्नांमध्ये तोचतोच पण येणार नः आणि उत्तर देणार्याला एकच उत्तर देऊन कांता येणार नई याची काळजी घ्यायला हवी.पंप
Saturday, 5 August 2017
एक अनोखी मुलाखत
Subscribe to:
Post Comments (Atom)
वेश्यावृत्ती कायदेशीर!
वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...
-
कुरळ्या केसांना कानामागे सारताना बेमालूमश्या अश्रूला नखावर झेलताना पडलेल्या तिच्या नजरेला काहीसं समजवताना झुकल्या हनुवटीशी हळूच बोलताना ...
-
वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...
-
"खूप खूप प्रवृत्ती माणूस नावाच्या आकारात तसा खुश होतो मी आरसा होण्याच्या प्रकारात" लिहितोस तर छानच.....माझ्यासाठीही होशील का आरस...
No comments:
Post a Comment