तुमचं सगळंच गोड असतं राव! तुमची रेखीवता पण आणि भांडणं पण. मग पांढरा कागद येतो तुम्हाला न्याय द्यायला, सगळे च्या सगळे मनापासून उतरता तुम्ही..त्याच्यावर रेघोट्या मारता. त्याच अस्तित्वच नाकारता, बिचारा स्वतःचा शुभ्र रंग हरवून बसतो तुमच्या भांडणात. पण त्याच त्याला काही सोयर सुतकच नसतं. त्याचं नवं रूप त्याला आवडतं आणि मग तोही सगळं विसरून काचेच्या पेटीत बसून भिंतीवर लटकतो! लोकांनी तुमचं कौतुक करावं म्हणून. त्या शांत शुभ्रतेला अवखळ सौंदर्याने मढवता तुम्ही आणि मग साऱ्यांची झुंबड उडते! तुम्हाला पहायला.
आता ⚪ पाहून तुम्ही म्हणाल तू रिकामा दिसतोस, रंगहीन वाटतोस. पण खरी गोष्ट माहितीये का, माझ्यामध्येच सामावले आहेत इंद्रधनू चे सारे रंग! मी म्हणजे शांतता,जारासही डाग पडला तर रुसतो मी, कोपऱ्यात जाऊन बसतो
पण खरंतर मिळून मिसळून वागायला मला आवडतं, सऱ्यांमध्ये मिसळतो, माझं अस्तित्व तर ठेवतोच त्यांची हि ओळख राखतो,
मी 🔴 बोलतोय!
एक्मेकांवरच प्रेम दाखवताना मला तुम्ही मध्ये आणता ना, खरच खूप छान वाटतं. मला प्रेमाचं प्रतीक मानता, आणि परत मलाच भीतीदायक म्हणून ठरवून टाकता? प्रेमळ आहे हो मी खूप. जेव्हा एखाद्या स्त्री च्या कपाळावर जाऊन बसतो तेव्हा आदराने साऱ्यांच्या नजरा तिच्या पायाशी येतात. जेव्हा ओठांवर फुलतो मी तेव्हा खूप छान दिसते ना ती!
कुठेही जखम झाली कि रक्तचं येतं ना बाहेर, मग जेव्हा महिन्यातून मी तिच्या भेटीसाठी जातो तेव्हा का तिला लांब बसवता तुम्ही? का तिला मंदिरात जायला बंदी? ते 5 दिवस तिचा जीव अगदी नकोसा करता...
मी म्हणजे प्रेम आहे...
मी म्हणजे ऊर्जा
मी म्हणजे सामर्थ्य
मी अग्नी आहे..
मीच रक्त
माझं अस्तित्व मान्य करा अथवा नका करू...दुनियेला झुकवायचीही ताकद माझ्यात आहे आणि दुनियेला हसवायचीही ताकद परिपूर्ण आहे.
तर मी ⚫ हा!
अगदी खरं खरं सांगा मुलींनो, माझ्या रंगाचं शर्ट घातलेला मुलगा चिंधड्या उडवतो ना तुमच्या मनाच्या?? हो! सुंदर आहे मी, आणि खुपसा स्ट्रॉंग! सहजासहजी कोणताही मिसळत नाही मी...आणि मिसळलो तरी त्याला आपलसं करून घेतो...निळ्याभोर आकाशात जेव्हा मी उगीच पसरत असतो तेव्हा शेतकरी कित्ती खुश होतो म्हणून सांगू? हसरी लोकं पाहायला आवडतात मला...तुमच्या डोळ्यातली नजर मी आहे...माझ्या अस्तित्वामुळे तुम्ही हि बहुरंगी दुनिया पाहू शकता...तुमचं सौन्दर्य खुलावणारा केशसंभार जेव्हा तुमच्या नितळ कंतीवर तरळतो ना, तेव्हा खरच खूप सुंदर दिसता तुम्ही! राहून राहून एकाच गोष्टीच वाईट वाटतं हो...जेव्हा सावल्या रंगामुळे तिला नाकारलं जातं ना तेव्हा तिचे अश्रू घायाळ करतात मला..चीड येते मग माझीच स्वतःची
त्या अंधांच्या डोळ्यांत तर सदोदित मीच असतो, जसा काय माझ्याच प्रेमात असतो..अंधार सोडून कशाचं कडे पाहत नाही तो..आणि मीही त्याला आयुष्यभराची साथ देतो...
अमावस्येला जेव्हा चंद्र माझी साथ सोडून जातो तेव्हा त्याच्या साऱ्या प्रेमिका त्याच्या साऱ्या चांदण्या माझ्या सेवेत असतात. फक्त. खुश होतो मी,खुश असतो, खुश राहतो.
Tuesday, 8 August 2017
रंग
Subscribe to:
Post Comments (Atom)
वेश्यावृत्ती कायदेशीर!
वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...
-
कुरळ्या केसांना कानामागे सारताना बेमालूमश्या अश्रूला नखावर झेलताना पडलेल्या तिच्या नजरेला काहीसं समजवताना झुकल्या हनुवटीशी हळूच बोलताना ...
-
वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...
-
"खूप खूप प्रवृत्ती माणूस नावाच्या आकारात तसा खुश होतो मी आरसा होण्याच्या प्रकारात" लिहितोस तर छानच.....माझ्यासाठीही होशील का आरस...
No comments:
Post a Comment