Saturday, 19 August 2017

मुलांच्या बदलत्या निवडी विषयी

टीव्ही म्हणजे माझ्यासाठी नशा होती. आई रागावली,लाव टीव्ही ,मैत्रिणीशी भांडण झालं, लाव टीव्ही. कार्टून लागलेलं असायचं कोणतातरी. त्यात वेळ जायचा. हि वेळ आमच्या लहान पणीची आता ची मुलं टीव्ही बघायला करत नाहीत. बरीच कारण आहेत त्याचीही, आजच्या लेखात आपण त्या कारणांचा मागोवा घेऊया. का पाहत नसावीत मुलं टीव्ही? जाहिरातींच्या भडिमारामुळे? हातात सहज मिळालेल्या मोबाइलला फोने मुळे? कि त्यांना टीव्ही म्हणजे टोचतोच पण वाटू लागलाय/ काही नवीन हवाय का त्यांना? असे बरेच प्रश्न उपस्थित राहतात. संशोधनातून असं दिसून आलं कि ह्याच जोडीला अशीच बरीच करणे आहेत.. त्यात सगळ्यात जास्त महत्वाचं कारण म्हणजे मोबाइलला फोने. मोबाइलला फोने चा अतिवापर करू नये असं म्हणतात पण याचमुळे काही सकारात्मक बदलही झालेले आहेत. आपण बघूया ते कसे?
पूर्वीच्या काळात घरातले बहुतेक लोक एकत्र टीव्ही पाहायला बसायचे. त्यमेली माध्यम कमी असल्यामुळे निवड सुद्धा मर्यादित होती. एक बातम्यांचा चॅनेल बाबांसाठी आईआजी साठी सिरीयल आणि बॅकचेकंपनी कार्टून नेटवर्क. आणि मूळ अक्षरश प्रेमात पडली, त्या अनोख्या कार्टून्स च्या. आजही आहेत. फरक एवढाच कि मुलांना आज तुम्ही दाखवलेलं काही नकोय. त्यांना त्यांची गोष्ट स्वतः तयार करायची आहे. मोबाइलला मध्ये अनेक प्रकारच्या कार्टून्स चे गेम्स आपण पाहतो. टीव्ही ने आधीपासूनच एखाद्या कार्टून हि वैशिष्ठे मुलांच्या मनात कोरून ठेवली आहेत.. कोणत्या वेळी कोणते पात्र काय करू शकते याचा विचार मुळे करू लागली आहेत. यामुळे फायदा हा होतो कि मुलांची विचार करायची क्षमता वाढत आहे, निर्णय घेणे मुलांना जमू लागले आहे. आता मुख्य प्रश्न हा उरतो कि मुळे टीव्ही कडून मोबाइलला कडे वळली कशी? तर त्याचीही करणे बरीच आहेत. टेलिव्हिसिओन वर वाढती चॅनेल्स, आई बाबांचे मुलाला वेळ ना देणे, मुलांच्या हाताला सहज लागणारे स्मार्टफोन्स. त्यात हि मुख्यत्वे स्मार्टफोन वर मुले आपल्या हाताच्या बोटावर सारे काही मिळवू शकतात..त्यासाठी त्यांना रिमोट घेऊन बसावे लागत नाही. आणि मुळात बसावे लागत नाही.. झोपून उठून कसेही कुठेही कोणत्याहीवेळी हातात मोबाइलला फोने घेता येतो.
थोडक्यात म्हणायचं तर आपल्या तालावर जग चालायला हवा किंवा आपल्या मनासारखं व्हायला हवा हे मुलांना पटत चालले आहे, या गोष्टीची त्यांना सवय होत आहे. कुठेतरी हा बदल सकारात्मक आहे हे मेनी करायला हवं.

Tuesday, 8 August 2017

फितुरी..

आजच्या जगात विश्वास कोणावरच ठेऊन चालत नाही. ज्ञानेश्वरांच्या भिंतीला पाय होते, आताच्या भिंतीला कानही असतात आणि तोंडही असतं. आजच्या सिमेंट कॉंक्रिट च्या राज्यात भिंतीच फार, त्यामुळे कुठे बोलायचीही सोय नाही. मग मला एक मैत्रीण मिळाली. मला सामावून घेणारी. समजून घेणारी. आपल्या मनात जेव्हा बरच काही खदखदत असत ना तेव्हा आपल्याला कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं. तशीच होती ती. शांत. समंजस. सारं काही ऐकून घ्यायची. उगाच फुकटचे सल्ले द्यायची नाही. आणि मुख्य म्हणजे विचार करायला लावायची...उगीच फालतू विनोद नाही. 
माझं मन हलकं करणं हे एकच जणू तीच काम. कोणे एके काळी तिला पाहिलं कि अगदी भडभडून यायचं मला, मग  माझे अश्रू सारे ओघळू लागायचे तिच्या गालावर. आणि रीती होत जायचे मी ...तिच्याच कुशीत. माझे सुकलेले अश्रू तिच्या सर्वांगावर अगदी ठळकपणे उठून दिसायचे. पण ते कोणी पाहू नये याची काळजी मात्र तिने घेतली. माझ्या रागाने,संतापाने तिच्या शुभ्र अंगांगावर व्रण उठले. जखमी. पचवले तिने ते! आणि मिरवतेही त्यांना! माझं सारं शल्य ,सारी दुःख स्वतःच्या पोटात गडप करून घेतली. माझी सक्खी सखी होती ती, सक्खी मैत्रीण होती. दिवसभर माझी वाट पाहत राहायची ,आणि रात्री मग आम्ही गप्पा मारायचो. एक तास.
बरीच वर्ष झाली, माझं सीक्रेट जगासमोर येऊ दिलं नाही तिने. फक्त माझी होती ती. फक्त माझी!
आणि, अगदी अचानक, एक दिवस, फितूर झाली! मला अस्सा राग आला होतं म्हणून सांगू? पण तिचंही बरोबर, तीन वर्षात तिच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं मी! तिलाही शेवटी मर्यादा होत्याच. माझी काळजी हि होतीच. आणि त्यातच तिला तो भेटला! सारं काही सांगितलं तिने त्याला. अगदी जस्सच्या तसं. तपशीलवार. मग तो ऐकतो होय? माझी काळजी तो घेऊ लागला. .....अगदी तिच्यासारखी. काही बोलायचं नाही. सगळे नखरे सहन केले माझे. बिलकुल judge केलं नाही मला. 
त्यांनच मला सांगितलं , ती जेव्हा बोलू लागली, अतिशय मोकळेपणी माझे शब्द त्याच्या हळव्या मनापर्यंत पोहोचवत होती. कदाचित तिचे जखमी व्रण पुसले जायची भीती होती तिला! मला एकटं करून कशी जाऊ शकत होती ती? निस्वार्थी होती ग अगदी! सारं सारं आयुष्य माझ्यासाठी जगली...मला जगवण्यासाठी झुरली...मी झुरू नये म्हणून हसली...आणि मी हसावं म्हणून फितूर झाली..हो! म्हणूनच फितूर झाली! माझी लाडकी डायरी......

रंग

तुमचं सगळंच गोड असतं राव! तुमची रेखीवता पण आणि भांडणं पण. मग पांढरा कागद येतो तुम्हाला न्याय द्यायला, सगळे च्या सगळे मनापासून उतरता तुम्ही..त्याच्यावर रेघोट्या मारता. त्याच अस्तित्वच नाकारता, बिचारा स्वतःचा शुभ्र रंग हरवून बसतो तुमच्या भांडणात. पण त्याच त्याला काही सोयर सुतकच नसतं. त्याचं नवं रूप त्याला आवडतं आणि मग तोही सगळं विसरून काचेच्या पेटीत बसून भिंतीवर लटकतो! लोकांनी तुमचं कौतुक करावं म्हणून. त्या शांत शुभ्रतेला अवखळ सौंदर्याने मढवता तुम्ही आणि मग साऱ्यांची झुंबड उडते! तुम्हाला पहायला.
आता ⚪ पाहून तुम्ही म्हणाल तू रिकामा दिसतोस, रंगहीन वाटतोस. पण खरी गोष्ट माहितीये का, माझ्यामध्येच सामावले आहेत इंद्रधनू चे सारे रंग! मी म्हणजे शांतता,जारासही डाग पडला तर रुसतो मी, कोपऱ्यात जाऊन बसतो
पण खरंतर मिळून मिसळून वागायला मला आवडतं, सऱ्यांमध्ये मिसळतो, माझं अस्तित्व तर ठेवतोच त्यांची हि ओळख राखतो,
मी 🔴 बोलतोय!
एक्मेकांवरच प्रेम दाखवताना मला तुम्ही मध्ये आणता ना, खरच खूप छान वाटतं. मला प्रेमाचं प्रतीक मानता, आणि परत मलाच भीतीदायक म्हणून ठरवून टाकता? प्रेमळ आहे हो मी खूप. जेव्हा एखाद्या स्त्री च्या कपाळावर जाऊन बसतो तेव्हा आदराने साऱ्यांच्या नजरा तिच्या पायाशी येतात. जेव्हा ओठांवर फुलतो मी तेव्हा खूप छान दिसते ना ती!
कुठेही जखम झाली कि रक्तचं येतं ना बाहेर, मग जेव्हा महिन्यातून मी तिच्या भेटीसाठी जातो तेव्हा का तिला लांब बसवता तुम्ही? का तिला मंदिरात जायला बंदी? ते 5 दिवस तिचा जीव अगदी नकोसा करता...
मी म्हणजे प्रेम आहे...
मी म्हणजे ऊर्जा
मी म्हणजे सामर्थ्य
मी अग्नी आहे..
मीच रक्त
माझं अस्तित्व मान्य करा अथवा नका करू...दुनियेला झुकवायचीही ताकद माझ्यात आहे आणि दुनियेला हसवायचीही ताकद परिपूर्ण आहे.
तर मी ⚫ हा!
अगदी खरं खरं सांगा मुलींनो, माझ्या रंगाचं शर्ट घातलेला मुलगा चिंधड्या उडवतो ना तुमच्या मनाच्या?? हो! सुंदर आहे मी, आणि खुपसा स्ट्रॉंग! सहजासहजी कोणताही मिसळत नाही मी...आणि मिसळलो तरी त्याला आपलसं करून घेतो...निळ्याभोर आकाशात जेव्हा मी उगीच पसरत असतो तेव्हा शेतकरी कित्ती खुश होतो म्हणून सांगू?  हसरी लोकं पाहायला आवडतात मला...तुमच्या डोळ्यातली नजर मी आहे...माझ्या अस्तित्वामुळे तुम्ही हि बहुरंगी दुनिया पाहू शकता...तुमचं सौन्दर्य खुलावणारा केशसंभार जेव्हा तुमच्या नितळ कंतीवर तरळतो ना, तेव्हा खरच खूप सुंदर दिसता तुम्ही! राहून राहून एकाच गोष्टीच वाईट वाटतं हो...जेव्हा सावल्या रंगामुळे तिला नाकारलं जातं ना तेव्हा तिचे अश्रू घायाळ करतात मला..चीड येते मग माझीच स्वतःची
त्या अंधांच्या डोळ्यांत तर सदोदित मीच असतो, जसा काय माझ्याच प्रेमात असतो..अंधार सोडून कशाचं कडे पाहत नाही तो..आणि मीही त्याला आयुष्यभराची साथ देतो...
अमावस्येला जेव्हा चंद्र माझी साथ सोडून जातो तेव्हा त्याच्या साऱ्या प्रेमिका त्याच्या साऱ्या चांदण्या माझ्या सेवेत असतात. फक्त. खुश होतो मी,खुश असतो, खुश राहतो.

पाऊस

पाऊस डोळ्यांत असतो माझ्या. अगदी रोज बरसतो. तरीही मला त्या पावसात भिजण्याचा कंटाळा येत नाही हे विशेष. रात्री झोपायला गेलं कि त्याच आभाळ गढुळतं. कडकडाट गडगडाट काहीही होत नाही. सगळं कसं अगदी श्रावणसरींसारखं, झरझर ओघळून शांत व्हायचं.
मला गरज होती अगं तुझी. अजूनही आहे. हे डोळ्यातलं पाणी तुलाच शोधतेय गं! सारख. तू हवीयेस! तुला हरवण्याची भीतीच नव्हती ना गं कधी. लहानपणापासूनच चिडायचे रागवायचे मी अन समजून घेणारी तू! ...माझी छोटी बहीण.
हा रिमझिमणारा पाऊस पहिला कि तुझी आठवण येते. आपण सायकल वरून क्लास ला जायचो. माझी बॅग तुझ्या रेनकोट मध्ये आणि मी भिजत! 15 पावसाळे एकत्र काढले आपण पण एकदाही भिजली नाहीस ना माझ्यासोबत? 10 ची परीक्षा झाल्यावर जाऊया भिजायला असं म्हणाली होतीस, अजून आठवतं मला! पण झाली तुझी परीक्षा आणि त्याच वर्षीच्या पहिल्या पावसात तुझ्या निर्जीव कलेवराकडे पाहत होते मी! तेव्हाही नाही भिजलीस हरामी. एम्ब्युलन्स मधूनच स्मशानात गेलीस. तुझ्याशिवाय नीरस वाटतोय गं हा पावसाळा. आता किळस वाटते, लहानपणी पावसात गांडूळ पकडायला जायचो आपण, माझी छत्री उलटी करून त्यात बेडुकमासे पकडायचो....आणि घरच्यांनी सांडून दिले कि रडून नुसता गोंधळ.
कोणीच नाही भिजत गं माझ्यासोबत पावसात. आज पण त्या अपुऱ्या स्वप्नांत रमते मी! जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही.
मला विचार करायला लावतो, म्हणून मला तो आवडतो.
तुझ्यासोबत केलेला नौटंकीपणा आठवायला लावतो, म्हणून मला तो आवडतो.
तुझ्या मृत्यू च्या दिवसाची आठवण करून देतो म्हणून? कदाचित हो! म्हणूनच मला तो आवडतो.
त्याच्या चवहीन जलबिंदूंमध्ये माझ्या डोळ्यातला खारट पाऊस लपला जातो म्हणून मला तो आवडतो.
हो! कितीही वाईट वागला तरी पाऊस मला आवडतो!

एक नवी सुरुवात

तशी घाबरट नाहीये मी बिल्कुल. पण तरीही कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना मला भीती वाटते. कुणाच्या तरी आधाराची गरज वाटते. डोळ्यांत स्वप्नं असतात पण त्यांना पंख नसतात. कॉलेज मध्ये यायची स्वप्न मी खुप लहानपणापासून पाहायचे, खूप अपेक्षा मनात बाळगायचे...मला असे मित्र मिळतील न माझा तसा ग्रुप होईल...उगीच..बराच काही. आज पासून माझं नवं कॉलेज सुरु होतंय. मित्र तर मिळालेत, पण ते शेवटपर्यंत टिकतील ना? कधी कधी उगाच नको त्या गोष्टीची भीती वाटते.

मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तुझ्याशी मैत्री होईल. आभाळाला लागलेलं फळ वाटायचास तू! खुपसा अबोल, शांत, गप्प गप्प... अगदी मोजकं बोलायचास. जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा वाटलं होतं तू खूप मोठा आहेस ..असामान्य ..सगळ्यांना काय काय नावं ठेवली आपण पण अजूनही आदित्य ला आदि म्हणताना भीती वाटते. आदरयुक्त भीती. तसाच आहेस तू.. तुझ्या नावसारखा. प्रभावशाली, प्रकाशमय..माझं अस्तित्वच उजळवून टाकलंयस. तुझं बोलणं मला माझ्यातल्या मीपणाची जाणीव करून देतं. माझीच स्वप्न मला नव्याने पटवून देतं.

हि सुरुवात एका नव्या मैत्रीची आहे. नव्या भावनेची आहे. आणि एका विश्वासाची. नशिबाने मिळालेलं रत्न आहेस तू. न पराखता पदरी पाडुन घेतलेलं!

होशील का माझ्या आयुष्याचा आरसा? चुका आणि कौशल्य अगदी स्पष्टपणे दाखवणारा? रंगवशील का माझी कोरी स्वप्नं तुझ्या विचारी नजरेच्या रंगांनी? माझ्या कवितेची प्रतिभा होशील?

उत्तरं नकोयत मला. मला माहिती असलेल्या उत्तरांमध्ये समाधानी आहे मी. बरं! एक सांगतेच आता ..तुझ्या गाण्याचा सूर काही छानसा लागत नाही, पण तुझ्या आवाजाचा गोडवा साऱ्या उणिवा भरून काढतो.

तुझ्या भरवशावर स्वप्नं पाहतेय ..पडले तर सावरशील?

खूप उर्मट आहे अरे मी ..चुकले तर हक्काने ओरडशील?

स्वप्नांच्या या आभासी दुनियेमध्ये कधी हरले तर हात देशील?

कधी भांडले तुझ्याशीच ....तर न रागावता माझी चूक मला समजावशील?

निखळ मैत्री कि काय म्हणतात ते आजपर्यंत अनुभवलं नाहीये मी, मैत्री करशील माझ्याशी?

म्हंटलं ते खरंय.. नवी सुरुवात करताना आपण अपेक्षाच जास्त ठेवतो!

माझं पाहिलं वाहिलं, आणि तेही चूकलेलं समीक्षण

त्या सगळ्यांसाठी, ज्यांना या जगातल्या दहाव्या आश्चर्याची उत्कंठा आहे. अर्थात the secret. तुम्ही जर तुमच्या विचारांवर खरंखुरं प्रेम करत असाल तर मी म्हणेन कि तुमच्या आयुष्यातले 2 दिवस तुम्ही वाया घालवू नका. ते पुस्तक वाचताना मानसिक समाधानाव्यतिरिक्त दुसरं काहीच मिळत नाही. आणि तुमचा जर खरंच इतका विश्वास आहे त्या पुस्तकावर किंवा त्यातल्या साखर लावलेल्या खोट्या शब्दांवर तर मग नोबेल मिळायला हवं होतं नाही का? जगातील साऱ्या माणसांची दुःख तुम्ही दूर करू शकता तर तुम्ही नोबेल चे हक्कदार नक्कीच आहात!

काही जुन्या लोकांचे विचार सांगून, त्यांना हे माहिती होतं पण लपवले गेले असं म्हणता...आणि तुम्ही ते जगासमोर आणलं म्हणता..तुम्हाला ते कुठं सापडलं? प्रत्येक सिद्धांताचे कारण हे असतेच...तुम्ही याचे समर्थन कसे कराल? कधीतरी युनिव्हर्स तुमच ऐकतं आणि कधीतरी नाही मग तुम्ही त्याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणू नका...आकर्षणाच्या शक्यता म्हणा! प्रत्येक गोष्टीला दोन शक्यता असतातच. .. एकतर हो किंवा नाही. आणि जर हो असेल तर ते तुमच्या युनिव्हर्स ने ऐकलं आणि नाही असेल तर त्याच्या नकारात्मक विचारांना दोष देणारा हा कुठला पळपुटा न्याय?

बरं! त्यात एक स्वप्नकथा आहे. कार पार्किंग ची! मीही करून पहिला हा प्रयोग. ट्रेन मध्ये खिडकीशी जागा मिळवण्याचा. आणि अगदी प्रत्येक वेळी तो यशस्वी हि होत गेला. एकदा काय झालं माहितीये? मी खूप जास्त विचार केला त्याच खिड्कीपाशीच्या जागेचा. आणि म्हंटलं मनात सगळ्यात शेवटी चढूयात, कारण ती जागा माझीच आहे...मलच मिळणारे. पण दुर्दैवाने त्याच दिवशी कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त विचार त्याच जागेचा केला होता!

त्यांना त्यांचे वाचक म्हणजे तोंडात भाताचा घास तसाच कोंबून एकाग्र नजरेने आईची गोष्ट ऐकणारी लहान मुलं वाटतात, कि त्यांना ते सांगतात युनिव्हर्स नावाचा एक जीनी आहे जसा अल्लादिन कडे होता...दिव्याच्या धुरातून येणारा आणि असं म्हणणारा कि तुमची इच्छा माझी आज्ञा!

तो एक नशीबवान मुलगा ज्याला सायकल हवी होती. पॉकेट मनी चे पैसे पिगी बँक मध्ये जमावण्याऐवजी, छोट मोठं काम करून गल्ला जमावण्याऐवजी किंवा सरळ आई बाबांना संगण्याऐवजी मूर्खासारखी कुठल्यातरी मासिकातली चित्र कापून भिंतीवर लावली. आणि त्याला सायकल मिळाली सुद्धा! अहो आश्चर्यम! मीही लावलेत माझ्या बालपणीचे photos भिंतीवर....आशा करते लौकरात लौकर माझं बाळपण मला परत मिळावं.

आणखी एक गोष्टय ती एका सिनेमॅटोग्राफर ची! ज्याला प्रेयसी मिळत नसते. वाह! म्हणजे तुमची प्रेयसी पण तुम्ही युनिव्हर्स कडेच मागता! आणि मग तो अनेक मुलींची नग्नचित्र काढून भिंतीवर लावतो. आणि युनिव्हर्स त्याला अनेक प्रेयस्या देतो. (प्रेयसी च अनेकवचन मराठीमध्ये काय आहे मला माहिती नाही, व्याकरणाच्या या चुकीसाठी क्षमा असावी)

आणखी एका paralysis झालेल्या माणसाबद्दल वाचलं होतं, ज्याच्या अडाणी डॉक्टरांचं आणि आळशी physiotherapist च सारं श्रेय त्याच्या मनातले बिचारे सकारात्मक विचार घेऊन गेले.

आणि हो! एक महत्त्वाचं सांगायलाच हवं. त्या पुस्तकातली पानं आणि त्याचं मूखपृष्ठ खरंच खूप चांगल्या दर्जाचं होत. खूपच.


Saturday, 5 August 2017

एक अनोखी मुलाखत

दोघांचेही चेहेरे असे कि समोरच बक्षीस आपल्यालाच मिळणारे. अर्णब गोस्वामी मुलाखतीला सुरुवात करतो तीच समोरच्याची लायकी काढायच्या उद्देशाने. माझं हिंदी फारसं चांगलं नाई तुमचं कसं ते आता समजेलच ह्या स्पष्ट उपरोधिक वक्तव्याचं उत्तर राज ठाकरेंची रोखलेली नजरच देते. तरीही निर्लज्ज पणे पहिल्या प्रश्नाला तो हात घालतो,पूर्ण मुलाखत ऐकताना असं वाटत राहतं कि बोलायचं दोघांनाही असत पण ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. मुलाखत घेणाऱ्याला फक्त प्रश्न विचारायचे असल्यासारखं वाटत ...समोरच्याच्या उत्तरांशी त्याच काही एक देणं घेणं नसत. आणि राज ठाकरेंना आपलं मत मांडायचा फक्त..समोरच्याचा प्रश्न काहीही असो..माझ्या मनातलं कोणी ऐकून घेत का, हा अविर्भाव. तरीही आपल्या मनातल्या कुठल्याही गोष्टीचा किंवा आपण जे काहीही बोलतोय त्याचा समोरच्याच्या प्रश्नांशी कुठून ना कुठून संबंध जोडणं राज ठाकरेंना छान साधत.
दोघंही एकमेकांना निरुत्तर करायचा कसून प्रयत्न करताना दिसतात, पाहताना वाटत कि आता राज ठाकरेंकडे या प्रश्नाचे उत्तर नसेल आणि त्यांच्या भल्यामोठ्या मुद्देसूद उत्तरानंतर अर्णब काय प्रश्न विचारतील याची उत्सुकता लागून राहते. मुलाखत तशी रंगात जाते ..पण प्रत्येक प्रश्नावर आणि प्रत्येक मुद्द्यावर अर्णब आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपण म्हणू तेच खरं असं थोडाफार पवित्रा अर्णब  गोस्वामींच्या बोलण्यात दिसतो. राज ठाकरेंचं बोलणं थोडंसं बेफिकीर वाटत आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्या सामर्थ्याचा अभिमान डोकावतो.
प्रश्न विचारताना अर्णब थोडा मूर्ख वाटतो . एकच प्रश्न फिरून फिरून कसं विचारावा हे त्याच्याकडून शिकवा...१० व्हीच्या मुलांसची प्रश्नपत्रिका खूप छान सेट करू शकेल तो.जसा आम्हाला हिस्टरी चा पेपर आलेला. एकच प्रश्न गोल गोल फिरवून विचारलेला. ऐकताना एक वेळ अशी येते कि अर्णब डोक्यात जातो. राज ठाकरे पण काही गप्पा बसत नाहीत, सरळ माईक काढून ठेवीन म्हंटल्यावर जी २ सेकंद शांतता मिळाली ती खरंच खूप गरजेची होती.पहिली दुसरीतला मुलगाही असले फालतू प्रश्न विचारणार नाही..काही वेळा तर असं झालं कि उत्तर देऊन झाल्यानंतर तो प्रश्न विचारला जातो. ज्याला काहीएक अर्थ उरत नाही. जी मुलाखत ४ ते ५ मिनिटात संपू शकली असती ती संपायला ४४ मिनिट्स लागतात...एवढा वेळ एका पोलिटिकल लीडर चाही वाया जातो आणि तमाम श्रोतृ वर्गाचाही.मुलाखतीची आखणी बरोबर वाटत नाही. मुलाखत सुरु होते मोदी वरून मग त्याला वळण मिळत उद्धव ठाकरे नंतर बाळासाहेब ठाकरेंना उगाच मध्ये आणलं जात मुंडेंवरून नितीशकुमारांपर्यंत फिरून मुलाखत परत बाजप वर येते. questionnair तयार करताना अर्णब गोस्वामींनी प्रश्नांमध्ये तोचतोच पण येणार नः आणि उत्तर देणार्याला एकच उत्तर देऊन कांता येणार नई याची काळजी घ्यायला हवी.पंप

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...