तू खूप भारी आहेस! हे मला स्वतःकडे पाहिल्यावर कळतं. किनाऱ्यावर उभी आहे मी, जिथे वासना विरक्तीशी वाद घालत असते. आशा प्रयत्न करून माघारी फिरत असते. एक ओली उर्मी माती खेचत असते, आपल्या सोबत खूप आत. समुद्राचे सारे दुष्ट विचार लाटा बाहेर आणत असतात, किनाऱ्यावर मोकळ्या करायला आणि तिथे आहे मी! खूप गोंधळ आहे इथे! अव्यक्त इच्छांचा कोलाहल आहे आणि तू उगवतोयस! जगाला दिशा दाखवतोयस! माझं मन नेहमी बुद्धीच्या स्वाधीन असतं, आज त्याच्यावर वर्चस्व गाजवतोयस तू!
माझ्यासाठी तू कोण आहे सांगू? एक स्वप्न! जागेपणी रेखलेलं! तुझ्यासारखं व्हायचंय मला! एकटं राहायचंय. फक्त नजरेने ठाव घ्यायचाय अख्ख्या जगाचा. हे पाणी बघ कसं चमचमतं. तुझ्यासाठी आतुरतं. समुद्राला कणाकणाने कोरडं करत तुझ्या जवळ उडून येतं.
इतके रंग आणतोस रोज कुठून तरी... आकाश उधळायला. तसं मला आयुष्य उधळायचय माझं, माझ्या लोकांसाठी. त्यांच्या खुषीसाठी, त्यांच्या गरजांसाठी आणि हव्यासासाठी. पण ते सुंदर रंग मिळवणं काही मला जमत नाही. तुटल्या भावना शब्दांत सांधण साधत नाही. कोरे रंग माझ्याच घरातले स्पष्ट दिसतात रे मला.. ते नीट झाकणं जमतंय, पण रिकामीपणातलं सौंदर्य जगासमोर मांडायला मन धजत नाही. माझं फार प्रेम आहे माझ्या माणसांवर, पण त्यांना आहेत तसं स्वीकारणं काही जमत नाही.
तू हव्यास आहेस की विरक्ती मला माहिती नाही पण तुझं जगापासून अलिप्त असणं मला मान्य नाही. नाही तर काय... तसाच आहेस तू! कुणाला जवळ येऊ द्यायचं नाही पण तू मात्र सतत डोकावतोस, आमच्या आयुष्यात. तुझी गरज तू दाखवून देतोस ...किंवा निर्माण करतोस. जळते मग मी. तुझ्यावर. ज्या दिवशी तुझ्या अस्तित्वाच्या दोऱ्या माझ्या हातात असतील ती जीत असेल माझी. म्हणून राग येतो तुझा.. तरी आवडतोस तू. कदाचित.

No comments:
Post a Comment